प्रारंभी बाळकृष्ण महाराज सुडके यांनी प्रास्ताविक भाषणात संत किसन महाराज सुडके पुण्यस्मरण सोहळा व साहित्य पुरस्कार विषयी माहिती दिली.
सोनई येथील पत्रकार विनायक दरंदले यांना खासदार लंके व नामदेव महाराज पोकळे यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच साहित्यिक तुळशीराम बोबडे, वासुदेव खोपडे, नरेश पाटील, डाॅ. लक्ष्मण शिवणेकर, डाॅ. श्रीकांत पाटील, सूर्यकांत धर्माधिकारी, नयन प-हाड, चुडाराम बल्हारपुरे, सत्यवान मंडलिक, दिनेश फडतरे, कविता मेहंदळे, गंगा गवळी, शिवाजी बागल, हरिश्चंद्र पाटील, प्रा. किरण वैद्य, डाॅ. शिवाजी घुंगरड, अजित देशमुख,प्रदिप पिंपळनेरकर,
विजयश्री सावजी, डाॅ. प्रभाकर शेळके, डाॅ. सुवर्णा गुंड, रत्नमाला शिंदे, नितीन शिंदे, बाळासाहेब गांगर्डे व सृष्टी शेकडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना खासदार लंके यांनी साहित्यिकांचा झालेला गौरव भुषणावह असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. अभंग यांनी माऊलींच्या भूमीत साहित्याचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे असे सांगितले.
कार्यक्रमास अनिल महाराज गरुड, मुंढे महाराज, राजु महाराज कातकडे, पंढरीनाथ महाराज, वखरे महाराज, माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,
राजेंद्र पाचे,सतिश थोरात ओंकार महाराज सुडके, लक्ष्मण पोंधे, योगेश रासने आदी उपस्थित होते.
रेवणनाथ पवार यांनी सुत्रसंचालन केले. प्राचार्य निवृत्ती मिसाळ यांनी आभार मानले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अगोदर बाळकृष्ण महाराज सुडके यांचे काल्याचे किर्तन झाले.