नेवासा/सुखदेव फुलारी
कोपरगाव येथील शिक्षिका सौ.संगीता अरविंद मालकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागा तर्फे ‘महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना, देण्यात येणारा सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि.४ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे.
यात म्हंटले आहे की, सदाचार, सदविचार, धर्मनिष्ठा, त्याग, समर्पण, दुरदर्शी, धोरणी, मुत्सद्दी अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या सर्वाभिमुख व्यक्तीमत्वाचा आदर्श जोपासून स्रियांनी पुढे यावे, यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात येतात.महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीसाठी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार
सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीसाठी समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
त्यात कोपऱगाव येथील शिक्षिका
सौ.संगीता अरविंद मालकर यांना
सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ घोषित झाला आहे.त्या कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षका म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२१-२२ पुणे विभागासाठीचा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे.


