नेवासा/सुखदेव फुलारी
श्रीक्षेत्र नेवासा तालुक्यातील सुरेगाव ते गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज रविवार दि.९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते व ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

राज्यातील महायुती सरकारने या पुलाच्या कामासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा विकसित होणारा मार्ग दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार असून, दोन्ही जिल्ह्यांतील अध्यात्मिक तसेच औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा देईल.
श्रीक्षेत्र नेवासा येथील पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत असून, नदीकाठच्या घाटांचे सौंदर्यवर्धन आणि विकासासाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
या प्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ.विठ्ठलराव लंघे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे, अब्दूल शेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे यांच्यासह वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


