भेंडा/नेवासा
३१ डिसेंबर २०२५ अखेर चालू आर्थिक वर्षाची पूर्ण आणि मागील थकीत पैकी ५० टक्के घर पट्टी व पाणी पट्टी भरणाऱ्या थकबाकीदारांना ५० टक्के सूट देण्याचा ठराव तसेच प्लॅस्टिक कचरा निर्मूलना करिता ग्रामपंचायतीनेच प्लॅस्टिक विकत घेण्याचा ठराव भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच सुहासिनी किशोर मिसाळ यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवार दि. १९ रोजी सरपंच सुहासिनी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अशोकराव मिसाळ,सुखदेव फुलारी, कारभारी गरड, नामदेवराव शिंदे, संतोष औताडे, बाळासाहेब वाघडकर, किशोर मिसाळ, माजी उपसरपंच पंढरीनाथ फुलारी,सदस्य दादासाहेब गजरे,कादर सय्यद, लता सोनवणे, सुहास वेताळ, डॉ. लहानू मिसाळ, अफजल पटेल, सतिष शिंदे, राजेंद्र चिंधे,कृष्णा गव्हाणे, बापूसाहेब फुलारी, नानासाहेब मते, संभाजी सोनवणे,यडू सोनवणे, मुख्याध्यापक रामभाऊ गवळी, ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे, बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
या सभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत थकीत घर व पाणी पट्टी भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत देणे, गावातील प्लॅस्टिक कचरा निर्मूलनासाठी घराघरातील प्लॅस्टिक कचरा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावणे, बाल विवाह प्रतिबंधक उपाय योजना करणे,घर व पाणी पट्टीच्या थकबाकीवर चर्चा होऊन लोक न्यायालयात देण्यापूर्वी नोटिसा देणे,रेशन कार्ड व धान्य वितरण,ऊस वाहतूक ट्रॅक्टर वरील टेपरेकॉर्डर मुळे होणारे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणणे, प्रक्रिये शिवाय सांडपाणी नैसर्गिक प्रवाहात सोडू नये,शासनाचे परिपत्रकानुसार गावातील बांधकाम मजूरांची पडताळणी करणे,गावठाण जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे निर्लेखन करणे,उर्दू शाळेच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करणे या विषयांवर सखोल चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले.
घर व पाणी पट्टीत ५० सूट देण्याचा ठरावाला प्रतिसाद देत कृष्णा गव्हाणे व सुहास वेताळ यांनी तत्काळ थकीत रक्कम भरल्याने त्यांचा ग्रामसभेत सत्कार करण्यात आला.


