Wednesday, November 26, 2025

चमत्काराला नमस्कार करणारे चिकित्सा करत नाहीत-विष्णू गायकवाड

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/प्रतिनिधी

निसर्गात अनेक चमत्कार होतं असतात उदा. चंद्रग्रहण, सुर्य ग्रहण, तारे तुटणे,भुकंप होणे, लाव्हा रस जमिनीतून निघणे, जंगलाला आग लागणे असे अनेक चमत्कार होताना दिसतात. त्यामागे कार्यकारण भाव असतो. मात्र कोणी बाबा-बुवा,माता, देवी, पिर, पाद्री,भामटे हे जे चमत्कार करतात त्यामागे कार्यकारण भाव नसून हातचलाखी असते. नव्हे नव्हे बदमाशीच असते. विज्ञानाचा , रसायनांचा उपयोग करून श्रद्धावान असलेल्या जनतेची फसवणूक करून त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक तर महिलांचे लैंगिक शोषण करतात . मात्र हा चमत्कार पाहताना कोणीही प्रश्न विचारत नाही. कारण चमत्काराला नमस्कार करणारे चिकित्सा करत नाहीत असे परखड मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगर जिल्ह्या कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यातील एरंडगाव
येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात
चमत्कार सादरीकरण आणि प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. गायकवाड बोलत होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बुधवंत हे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अंनिस शेवगाव तालुका उपाध्यक्ष वसंत जगधने , समसुद एरंड गावचे सरपंच संतोष धस, भागवत एरंड गावचे सरपंच गोकूळ भागवत ,अजित धस आदी मान्यवर विचार पिठावर
उपस्थित होते.

शेवगाव तालुका अध्यक्ष बबनराव धावणे, कार्याध्यक्ष डॉ. गणेश चेके, प्रा. महादेव काटे, अध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांनी त्यांच्या मनोगतात अंधश्रद्धा निर्मूलन होणेसाठी साघींक प्रयत्नांची गरज असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी जीवनात अंनिस चळवळीचे काम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

नवनाथ कदम यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन घुगे यांनी सुत्रसंचलन केले. कैलास नजन यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सहकारी शिक्षकांनी यशस्वी प्रयत्न केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!