Thursday, November 27, 2025

जिल्हा सहकारी बँक व्हाया साहेब ते भाऊ

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

महाराष्ट्रात पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर येथे स्थापन झाली. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी प्रवर्तक म्हणून बँक नोंदणीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे दाखल केला होता.

नगरचे तत्कालीन खासदार मोतीभाऊ फिरोदिया, मारुतराव घुले पाटील (दहिगावने), डॉ.एस.व्ही.निसळ, मोतीलाल बोरा,चंद्रकांत दळवी (हंगा), विश्‍वनाथ मुसमाडे अप्पासाहेब कदम (देवळाली प्रवरा), जगन्नाथ बनकर (पढेगाव), हरिभाऊ शेळके (शिर्डी), के.बी.रोहमारे (कोपरगाव), काशिनाथ धनवटे (पुणतांबा), बाळासाहेब काळे (सारोळा कासार), बाळकृष्ण देवचक्के, सखाराम पाटील (नेवासा), पंढरीनाथ आंबारे (अकोले), नारायण उंबरकर (आश्‍वी), पुरुषोत्तम यादवाडकर या प्रवर्तकांच्या प्रयत्नांतून जिल्हा बॅंकेची ३ ऑक्टोबर, १९५७ रोजी स्थापना झाली. १ मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन बॅंकेच्या कामकाजाला सुरवात झाली. जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब भारदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मोतीभाऊ फिरोदिया हे बॅंकेचे पहिले सरकार नियुक्त अध्यक्ष होते. 

नगर जिल्ह्यात आशिया खंडात अग्रगण्य असलेली अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही आशिया खंडातील आघाडीची सहकारी बँक म्हणून ओळखली जाते.बँक स्थापनेत आणि ती वाढविण्यात घुले घराण्याचे मोठे योगदान आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील हे स्थापनेपासून संचालक तर १९७८ ते १९७९,१९७९ ते १९८०, १९८७ ते १९९२ असे ६ वेळा बँकेचे अध्यक्ष होते.
त्यानंतर त्यांचे अनुयायी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग हे सलग २ वर्षे अध्यक्ष होते. आज पुन्हा चंद्रशेखर घुले यांच्या रूपाने जिल्हा सहकारी बँकेचे नेतृत्व घुले घरण्याकडे आले आहे.

*अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थापने पासूनचे अध्यक्ष…*

१)मोतीलालजी कुंदनमलजी फिरोदिया (सरकार नियुक्त २१.३.५८ ते २६.१.६३)
२) कारभारी भिमाजी रोहमारे (१९६२-६४)
३) साहेबराव यादवराव पाटील (१९६४-६५)
४) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९६५-६६)
५) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९६६-६८)
६) डॉ.वि‌ठ्ठलराव विखे पाटील (१९६८-७०)
७) केशवराव भिकाजी हारदे (१९७०-७१)
८) डॉ.विठ्ठलराव विखे पाटील (१९७१-७२)
९) डॉ.विठ्ठलराव विखे पाटील (१९७२-७३)
१०) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९७३-७४)
११) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९७४-७७)
१२) मारुतराव शंकरराव घुले पाटील (१९७७-७८)
१३) मारुतराव शंकरराव घुले पाटील (१९७८-७९)
१४) दादा शहाजी रोहमारे(१९७९-८०)
१५) किसनराव राजाराम हराळ (१९८०-८१)
१६) भाऊसाहेब महादेव हांडे (१९८१-८४)
१७) रावसाहेब कोंडाजी साबळे (१९८४-८५)
१८) रावसाहेब कोंडाजी साबळे (१९८५-८६)
१९) मारुतराव शंकरराव घुले पाटील (१९८६-८७)
२०) मारुतराव शंकरराव घुले पाटील (१९८७-८८)
२१) मारुतराव शंकरराव घुले पाटील (१९८८-९०)
२२) मारुतराव शंकरराव घुले पाटील
(१९९०-९१)
२३) मारुती देवराम शेळके(१९९१-९२)
२४) एकनाथ बुवासाहेब निंबाळकर
(१९९२-९३)
२५) यशवंतराव कंककराव गडाख पाटील (१९९३-९५)
२६) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९९५-९७)
२७) भाऊसाहेब संतुजी थोरात (१९९७-९९)
२८) यशवंतराव कंकरराव गडाख पाटील(१९९९-२००२)
२९) यशवंतराव कंकरराव गडाख पाटील (२००२-२००३)
३०) यशवंतराव कंकरराव गडाख पाटील (२००३-२००४)
३१) यशवंतराव कंकरराव गडाख पाटील (२००४-२००५)
३२) ज्ञानदेवराव दौलतराव पठारे (२००५)
३३) राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (२००५-२००६)
३४) राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (२००६-२००७)
३५) शंकरराव यशवंतराव गडाख पाटील (२००७-२००८)
३६) शिवाजीराव भानुदास कर्डिले (२००८-२००९)
३७) पांडूरंग गमाजी अभंग (२००९-२०१०)
३८) पांडूरंग गमाजी अभंग (२०१०-२०११)
३९) बाजीराव खंडूजी खेमनार(२०११ ते २०१५)
४०) सिताराम कोंडाजी गायकर (२०१५ ते २०२१)
४१) उदय गुलाबराव शेळके (६.३.२०२१ ते ११.२.२०२३)
४२) शिवाजीराव भानुदास कर्डिले (८.३.२०२३ ते १७.१०.२०२५)
४३) चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील (२४.११.२५ पासून)

*साहेबांचे शेतकरी-बँक कर्मचारी हिताचे निर्णय*

लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी शेतकऱ्यांना लिफ्ट इरिगेशन पाईप लाईन करिता कर्ज देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
त्याच बरोबर 1979 मध्ये बँक कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला होता,त्याचे श्रेय आजही बँक कर्मचारी घुले पाटलांना देत आहेत.

*माजी आमदार श्री.चंद्रशेखर घुले पाटील यांची सहकारातील कार्यकिर्द…*

१) श्री.ज्ञानेश्वर फळे भाजीपाला व कृषीपूरक सहकारी संस्था लि., ज्ञानेश्वरनगर या सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून सहकारातील सुरुवात.
२) लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का.लि., ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे साखर कारखाना, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या कारखान्याचे अध्यक्ष (०१/०३/१९९९ पासून १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत)
व सध्या विद्यमान संचालक
३) शेवगांव तालुका सहकारी दुध व्यावसाईक संघ लि.चे संस्थापक संचालक (जानेवारी २००१ पासून ते ३१/०३/२००६ पर्यंत)
४)अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अहमदनगर या बँकेचे संचालक (सन २००३ पासून)
५) दि. डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट असोसिएशन (इंडिया) पुणे या संस्थेचे तहहयात सभासद.
६) दि.शुगर टेक्नॉलाजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, नवि दिल्ली या संस्थेचे तहहयात सभासद.
७) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबईचे उपाध्यक्ष (२२ डिसेंबर २००७ ते ३ जानेवारी २००९)
८) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक (जानेवारी २००९ पासून जानेवारी २०११ पर्यंत)
९)महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई या बँकेचे संचालक (फेब्रुवारी २००९ पासून जानेवारी २०११ पर्यंत)
१०) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबईचे अध्यक्ष (३ जानेवारी २००९ पासून १७ डिसेंबर २०१० पर्यंत)
११) दि. प्रिमियर को-ऑप. प्रिंटर्स, पुणे (महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय)चे संचालक (फेब्रुवारी २०१० पासून २०२४ पर्यंत)

-सुखदेव एकनाथ फुलारी
कामगार संचालक,
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का.लि.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!