Tuesday, December 2, 2025

‘महाव्हेट’च्या राज्य अध्यक्षपदी डॉ. अनिल गडाख विजयी

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या(महाव्हेट) राज्य अध्यक्षपदी डॉ.अनिल गडाख विजयी झाले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेची निवडणूक शिर्डी येथे ३० नोव्हेंबरला पार पडली. यासाठी राज्यभरातून १६२५ पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच सह आयुक्त पशुसंवर्धन हे मतदान करण्यासाठी उपस्थित होते.

राजपत्रित पशुवैद्यक संघटना ही राज्यस्तरावर पशुसंवर्धन विभागातील वर्ग -१ अधिकाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करण्याचे काम करते. या संघटनेच्या राज्याध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गडाख यांची बहुमताने निवड झाली. त्यांच्यासोबत संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. मंदार मराठे (नागपूर) व डॉ. उपेंद्र गायकवाड (नांदेड), उपाध्यक्षपदी डॉ. गणेश निटुरे (लातूर), दुर्गा मंच अध्यक्षपदी डॉ. ललिता गावडे (पुणे) व उपाध्यक्षपदी डॉ. जया राऊत (यवतमाळ), संपादक महाव्हेट जर्नल या पदावर डॉ. सचिन रहाणे (पुणे), नाशिक विभागीय सचिवपदी डॉ. योगेश मेहेरे, छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिवपदी डॉ. रंजित शेजूळ, पुणे विभागीय सचिवपदी डॉ. अमोल येडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. डॉ. अनिल गडाख यांच्या रूपाने जिल्ह्यास पहिल्यांदाच राज्य अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे.

या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी डॉ. अनिल गडाख यांचे अभिनंदन केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित असलेल्या आस्थापनाविषयक बाबी, वेतन त्रुटी विषयक बाबींचा राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्यांचा निपटारा करण्यासाठी काम करणार असल्याचे डॉ. गडाख यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!