अहिल्यानगर/प्रतिनिधी
राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी आजमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास खर्चे यांची नियुक्ती तर डॉ मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड जाहीर केली.
डॉ मनाली क्षीरसागर या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका (तांत्रिक) व सल्लागार पदावर कार्यरत आहेत.
एका स्वतंत्र आदेशाद्वारे राज्यपाल देवव्रत यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ विलास काशिनाथ खर्चे यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
दोन्ही कुलगुरूंच्या नियुक्त्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत असतील.
**राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ मनाली क्षीरसागर; तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास खर्चे यांची नियुक्ती*
राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज डॉ मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड जाहीर केली.