Tuesday, December 2, 2025

अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांना सेवारत्न पुरस्कार

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई, दि. २९

साईदिशा प्रतिष्ठान व आयटीएसएफ यांच्या वतीने शासकीय सेवा विभागात दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार अपर जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी नुकताच स्वीकारला. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात आयोजिलेल्या २५ व्या ‘नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ वितरण सोहळ्यात श्रीमती भिकाने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अभिनेते मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, पार्श्वगायक कुमार शानू, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिध्दार्थ जाधव, साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माने उपस्थित होते.

श्रीमती भिकाने यांनी उत्कृष्ट शासकीय सेवेबरोबरच प्राण्यांची देखभाल, गोरक्षा, निसर्गसंरक्षणासाठी मोठे काम केले आहे. विशेषतः रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. सांगलीमध्ये रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कामांमुळे उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने यापूर्वीच त्यांना गौरविले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!