नेवासा/प्रतिनिधी
श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेने काढलेली २०२६ ची विचारधन दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रेरणादायी विचारांची बीजे पेरली जात आहेत. जगात चांगल्या विचाराचे धन सर्वश्रेष्ठ आहे. नागेबाबा पतसंस्थेची ही फक्त दिनदर्शिका नसून ती विचारदर्शिका असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र नागेबाबा संस्थांनचे अंकुश महाराज कादे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अंकुश महाराज कादे व कुंडलिक महाराज गोरे यांचे हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते.
दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाला
प्रगतशील शेतकरी सोपानराव पेहेरे, कृष्णाई उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब काळे,नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड , माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,डॉ.शिवाजी शिंदे,गणेशराव गव्हाणे, किशोर मिसाळ, अजित रसाळ, भाऊसाहेब फुलारी,गणेश महाराज चौधरी , शिवाजी फुलारी, उद्योजक बाबासाहेब नजन,डॉ.लहानू मिसाळ, संजय शहाणे, गोरख फुलारी, दादासाहेब गजरे, कादर सय्यद,शंकर भारस्कर, संजय नवले,सुभाष चौधरी, राजेंद्र चिंधे,अवधूत लोहकरे,वाल्मिक लिंगायत, जालिंदर देशमुख, संजय वायकर, तुळशीदास फुलारी, बंडू आंदुरे,हेमंत बारगजे,आदेश जावळे, युवराज देशमुख,जालिंदर आरगडे, केशव पंडित,सिद्धांत सिड्सच्या संचालिका मिराताई नवले,प्रा.सविता नवले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
अंकुश महाराज कादे पुढे म्हणाले की, कमी वयामध्ये महाराष्ट्रभर कीर्ती कमावणारे आणि अर्थस्वरूपाने सर्वांनाच मदत करणारे कडूभाऊ काळे हे आपणा सर्वांचे आदर्शस्थान आहे.त्यांचा संकल्पनेतून नागेबाबा दिनदर्शिका सभासद,खातेदार,ठेवीदार व संस्थेच्या हितचिंतकांना दरवर्षी विनामूल्य घरोघरी पोहचवली जाते. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर प्रेरणादायी व संस्कारक्षम विचारांची शिदोरी आहे. अशा विचारांची नागेबाबा पतसंस्थेची ही दिनदर्शिका सर्वांसाठी मार्गदर्शिका ठरेल. नागेबाबा पतसंस्थेची अधिकाधिक वृद्धी व्हावी आणि लोककल्याणाच्या कार्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन भरभरून साथ द्यावी.
यावेळी उपस्थित दानशूर व्यक्तींनी
दवाखान्यात एडमिट असेलल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी
नागेबाबा परिवाराने सुरू केलेल्या अन्नदान योजने करिता ६५ हजार रुपयांचा निधी दिला.
संस्थेचे कोअर टीम मेंबर सचिन जाजू ,
विकास अधिकारी नांदे, कन्हैय्या काळे,शाखाधिकारी लक्ष्मण थोरात, मोहन वाघडकर, ऐश्वर्या काळे, आरती जैन,सागर इटकर,सय्यद सिराजोद्दीन, सानिया शेख,राणी राजगुरू,कामिनी बोरुडे,सुधाकर गायकवाड, अंकुश शिंदे, बाळासाहेब शिंदे आदिंसह संस्थेचे कर्जदार ,खातेदार , हितचिंतक उपस्थित होते.
संजय मनवेलीकर यांनी स्वागत केले.
दिलदार शेख यांनी प्रास्ताविक केले .
शाखा व्यवस्थापक संतोष साप्ते यांनी आभार मानले


