Wednesday, February 11, 2026

राज्यातील ५६२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

महाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यातील ९७ सहकारी व ९८ खाजगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२५ अखेर एकूण ५६२.१ लाख टन उसाचे गाळप केले असून ४९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के इतका आहे.

*कोल्हापूर विभाग:– १२२.६१ लाख टन उसाचे गाळप करून कोल्हापूर विभागाने १२६.५४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा १०.३२ टक्के इतका आहे. विभागात २५ सहकारी आणि १२ खासगी असे ३७ कारखाने सुरु आहेत. ऊस गाळप आणि साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे.

*पुणे विभाग:–पुणे विभागात १७ सहकारी आणि १३ खाजगी असे एकूण ३० कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत १३३.३९ लाख टन उसाचे गाळप करून १२०.३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा ९.०२ टक्के आहे.

*सोलापूर विभाग:– ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १६ सहकारी आणि २९ खाजगी असे एकूण ४५ कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात १२२.८२ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ९६.४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ७.८५ टक्के इतका आहे.

*अहिल्यानगर विभाग:– अहिल्यानगर विभागातील १५ सहकारी आणि ११ खाजगी असे एकूण २६ कारखाने सुरु झाले आहेत. या विभागातील नगर-नाशिक जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ६७.१७ लाख टन उसाचे गाळप करून ५५.४५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा ८?२६ टक्के आहे.

*छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर विभागात १३ सहकारी व ९ खाजगी अशा २२ कारखान्यांनी
५३.१५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ३९.३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ७.४ टक्के इतका आहे.

*नांदेड विभाग:– नांदेड विभागात १० सहकारी व १९ खाजगी अशा २९ कारखान्यांनी ५६.८ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ४८.६५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ८.६७ टक्के इतका आहे.

*अमरावती विभाग:– अमरावती विभागातील १ सहकारी व ३ खाजगी असे ४ कारखाने सुरु असून ५.९३ लाख टन उसाचे गाळप करून ५.१४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा ८.६७ टक्के आहे.

*नागपूर विभाग:– नागपूर विभागात २ खाजगी कारखान्यांनी ०.२५ लाख मे. टन उसाचे गालप करून ०.१८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरसरी साखर उतारा ७.२ टक्के आहे.

मागील वर्षी याच काळात ३६९.३९ लाख टन उसाचे गाळप होऊन ३१७.०२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होत आहे.
—————————-

*अहिल्यानगर जिल्हा*
———————-
अहिल्यानगर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी दि.३१ डिसेंबर २०२५ अखेर ६२ लाख २७ हजार ५४३
मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन
५० लाख ५५ हजार ११८ साखर पोती उत्पादित केली.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.१२ टक्के आहे.जिल्हयातील इतर कारखान्यांचे ऊस गाळप मेट्रिक टन, उत्पादित साखर पोती व कंसात साखर उतारा टक्के असे…

१) अंबालिका- ८७१३९०मे. टन,६२६६०० पोती (७.३४)

२) ज्ञानेश्वर–५३७५७० मे. टन,४५९६५० पोती (८.३३),

३) मुळा- ५२७७८० मे. टन , ३९९६५० पोती (७.६२),

४) गंगामाई–५०६६८० मे. टन,२८२००० पोती (५.३५)

५) प्रवरा- ४८०८०० मे. टन ,३४६८५० पोती (७.२६),

६) संगमनेर- ४३३९६० मे. टन, ३६२८२० पोती (८.४१)

७) श्रीगोंदा- ३९५६१० मे.टन,३९९१०० पोती (९.७७),

८) कोळपेवाडी-३४२८३५ मे. टन, ३५०५०० पोती (१०.१५),

९) प्रसाद शुगर- ३१४८३० मे. टन , ३१५८५० पोती (१०.१)

१०) कोपरगाव-२३५८३४ मे. टन, १६५३७५ पोती (८.९४),

११) गणेश-१००९५० मे.टन, ८२७७५ पोती (८.२१),

१२) अशोक- २३३३८० मे. टन, २०११५० पोती (८.६४),

१३) वृद्घेश्वर- १७४२३० मे. टन,१५१२५० पोती(९.९३),

१४) केदारेश्वर- ६५३३० मे. टन,५११०० पोती (७.७१)

१५) अगस्ती-१४८७८० मे. टन,१३६६५० पोती (९.९३)

१६) क्रांतिशुगर-१६२६०० मे. टन,१७५७०० पोती (१०.६७)

१७) बारामती एग्रो- १७५४२४ मे. टन,१६०८२० पोती (१०.५१)

१८) स्वामी समर्थ- १६३००४ मे. टन,१३७८८३ पोती (९.४५)

१९) ढसाळ एग्रो- ९८८८७ मे. टन,५८६२० पोती (९.१७)

२०) गौरी शुगर-२०६३३० मे. टन,१४३३७५ पोती (७.०९)

२१) साजनशुगर-५१३४० मे. टन, ४७४०० पोती (९.३३)

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ सहकारी साखर कारखान्यांनी एकूण ३६ लाख ७७ हजार ०४९ मे. टन ऊसाचे गालप करून ३१ लाख ०६ हजार ८७० साखर पोती उत्पादित केली आहे. तर ९ खाजगी
साखर कारखान्यांनी एकूण २५ लाख ५० हजार ४८५ मे. टन उसाचे गालप करून १९ लाख ४८ हजार २४८ साखर पोती उत्पादित केली आहे.
नगर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी एकूण ६२ लाख २७ हजार ५४३ मे. टन उसाचे गालप पूर्ण होऊन ५० लाख ५५ हजार ११८ पोती साखर निर्मिति झालेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!