शेवगाव/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील गं.भा.कौशल्याबाई नारायणराव नरवडे पाटील (वय १०२ वर्षे) यांचे बुधवार दि.३१ डिसेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सुना,पाच नातू-पणतू असा परिवार आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे व सौ.सुमन शिवाजीराव शिसोदे यांच्या त्या मातोश्री, मनोज नरवडे,पंकज नरवडे,प्रशांत नरवडे,युवराज नरवडे,डॉ.विनोद सिसोदे यांच्या आजी
तर दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या विहीनबाई होत.


