भेंडा(नेवासा)
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे ‘द’नव्हे दारूचा ‘द’ फक्त दुधाचा उपक्रमाने गत वर्षाला निरोप तर नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
दर वर्षी ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई, अनेक नागरिक मद्य सेवन करतात. यामुळे अपघात होतात. तर नवीन वर्षाचे स्वागत हळद युक्त मसाला दूध पिऊन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते, हा संदेश देण्यासाठी भेंडा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवार दि. ३१ डिसेंबरच्या सायंकाळी नागरिकांना ५० लिटर मसाला दूधाचे वाटप केले.
भेंडा येथील डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.संतोष फुलारी, इंजि.नजन फुलारी यांनी नवं वर्षाचे पूर्वसंध्येला तरुणांना मसाला दूध वाटप करून सरत्या वर्षाला निरोप तर नवं वर्षाचे स्वागत करण्याचा प्रस्ताव मांडला,त्यास इतरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
फुलारी हॉस्पिटलच्या प्रांगणात गॅसभट्टी पेटवून मसाला दूध तयार करून
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना व युवकांना मोफत मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. भेंडा गावात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याने दूध पिण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.संतोष फुलारी,गोरख फुलारी यांनी दूध उपलब्ध करून दिले.केशर युक्त मसाला दूध तयार करण्यासाठी भाऊराव मुळे, अनिल कनगरे, मोहन काळे, नयन फुलारी यांनी मदत केली. देवेंद्र काळे, प्रदीप फुलारी व कार्यकर्त्यांनी दूध वाटपासाठी सहकार्य केले.
‘द’ नव्हे दारूचा ‘द’ फक्त दुधाचा
या उपक्रमांतर्गत सरत्या वर्षाला निरोप देत व्यसनमुक्तीतून आरोग्य साधना या विधायक उपक्रमाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, पत्रकार सुखदेव फुलारी, अशोकराव वायकर, माजी उपसरपंच दादा गजरे, सतिष फुलारी, अजित साबळे, नानासाहेब जोगदंड, सुनील वांढेकर, बाबासाहेब गव्हाणे,बाबासाहेब गोर्डे, डॉ.ईश्वर उगले,नामदेव बोरूडे,शिवाजी शिरसाठ, शिवाजी फुलारी, महेश गव्हाणे,शाकीर सय्यद,वजीर शेख, दिलीप गोर्डे, धीरज निकम,विष्णू फुलारी,ऋषी गव्हाणे,विजय चौधरी आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.


