Wednesday, February 11, 2026

शनिशिंगणापूर देवस्थानने शनि चौथरा दर्शन शुल्क बंद करावे

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील  श्री शैनेश्वर देवस्थानने शनि चौथऱ्यावर जाऊन  दर्शन घेण्यासाठी सुरु केलेले ५०० रुपये दर्शन शुल्क बंद करावे अशी मागणी कांगोणी,ता.नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान बाबासाहेब रावडे यांनी देवस्थानचे प्रशासक डॉ.प्रवीण गेडाम यांच्या कडे केली आहे. त्वरित निर्णय न घेतल्यास २६ जानेवारी पासून प्रशासकीय कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासक डॉ. गेडाम यांना दिलेल्या निवेदनात श्री.रावडे म्हणाले की,शनिशिंगणापुर देवस्थान येथे देश-विदेशातुन भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना काही सुचना,निवेदने दयावयची असल्यास, काही समस्या बाबद बोलायचे असल्यास देवस्थानला मोठी आर्थिक मदत दयावयाची असल्यास त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निराकरण करणेकरिता प्रशासकीय कार्यालयात देवस्थानचा जबाबदार अधिकारी कायम उपस्थीत असणे आवश्यक आहे.त्यामुळे
शिंगणापुर मुख्यालयी वास्तव्यास राहिल आणि प्रशासकीय कार्यालयान कायम उपस्थीत असेल अशा जबाबदार व सक्षम अधिकाऱ्याची
देवस्थानने तातडीने नेमणूक करावी.

 तसेच   शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी प्रति भाविक ५०० रुपये याप्रमाणे पैसे घेउन दर्शनासाठी चौथऱ्यावर जाऊ दिले जाते. ५०० रुपये न देणाऱ्या भाविकाला चौथऱ्यावर जाण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ५०० रूपये प्रती भाविक पैसे घेवून शनि शिंगणापुर देवस्थानचे प्रशासनाकड़ून भाविकांची लुटमार होत आहे. दर्शनासाठी पैसे घेण्याची ही पद्धत भेदभाव करणारी व अन्यायकारक असल्याने ती बंद करण्यात यावी.
या निवेदनातील भाविकांच्या हिताच्या मागण्यांची हीतामाणी देण्यात आले गंभीरपणे दखल घेउन योग्य कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि. २६ जानेवारी २०२६ पासून शनिशिंगणापुर देवस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!