नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील डेअरी उद्योजक रविंद्र काशिनाथ नवले पाटील यांना प्रोग्रेसिव्ह बिडर फार्मर्स असोसिएशनच्या वतीने नाविन्यपूर्ण दुग्ध उत्पादक पुरस्कार (INNOVATIVE DAIRY FARMER AWARD 2026) देवून सन्मानित करण्यात आले.

कळस(ता.संगमनेर) येथे आयोजित कृषि व पशु प्रदर्शनात महाराष्ट्राचा पहिल्या INNOVATIVE DAIRY FARMER AWARD 2026 चे वितरण करण्यात आले.
यावेळी गुजरात येथील शिव छत्रपती डेअरी मिल्क प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार असलेले रविंद्र नवले व आशुतोष भोसले यांना हा INNOVATIVE DAIRY FARMER AWARD पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.नवले व श्री.भोसले यांनी महाराष्ट्रातून जाऊन गुजरात येथे 180 गायींचा फार्म सुरू करण्याचे धाडस केल्याचे कौतुक आज सर्वत्र झाले.
या बाबद बोलतांना श्री.नवले म्हणाले की, अमूल डेअरी मध्ये पहिल्या सहा महिन्यातच आमचा फार्म Revenue wise TOP 10 (एका आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 10 कंपन्या) मधे पोहचला आहे आणि लवकरच TOP 5 मधे असणार आहे.नक्कीच ह्या पुरस्काराने येणाऱ्या काळात गुजरात मधे महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यास पाठबळ मिळाले आहे,असे आम्ही समजतो.


