Wednesday, June 24, 2026

नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद देशपांडे

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी  गुरूप्रसाद देशपांडे  यांची सार्वनुमते निवड करण्यात आली आहे. 

सोमवार दि.१२ जानेवारी रोजी  प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रम विषयी चर्चा, विविध विषयांवरील पत्रकार परिषदांचे आयोजन, शहरातील पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्न, गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबीत असलेल्या पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न या बाबत चर्चा करण्यात आली.
कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी स्वागत केले. तर दैनिक सकाळचे प्रतिनिधी व मावळते अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक करून संघाच्या कामकाजाची माहिती सांगितली. 
 
*प्रेसक्लब नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे-

उपाध्यक्ष- कैलास शिंदे(पुढारी) व अशोक डहाळे(सामना),सचिव-सुहास पठाडे(लोकमत),सहसचिव- मकरंद देशपांडे (सार्वमत),खजिनदार- मोहन गायकवाड( सकाळ)
कार्याध्यक्ष- सुधीर चव्हाण(राष्ट्र सहयाद्री ),संघटक- पवन गरुड(प्रभात) व रमेश शिंदे(सार्वमत ) यांची निवड करण्यात आली.  .

मावळते अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी मागील कालावधीतील उपक्रमातील माहिती दिली. तसेच यावेळी त्यांचा मागील वर्षातील चांगल्या कामकाजाबद्दल प्रेस क्लबच्या वतीने अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. या बैठकीस शंकर नाबदे,नानासाहेब पवार,शाम मापारी,अभिषेक गाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!