Sunday, March 29, 2026

क्रिकेट खेळामुळे खिलाडूवृत्ती व संघटन क्षमता वाढते-डॉ.क्षितिज घुले पाटील

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

क्रिकेटमुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो.शरीर आणि मन तंदुरुस्त रहाते. त्याच बरोबर क्रिकेट खेळामुळे संघीक भावना वाढीस लागते, खिलाडूवृत्ती व संघटन क्षमता वाढते असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी केले.

भेंडा येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाचे क्रीडांगणावर आयोजित माजी आमदार नरेंद्र घुले पाटील चषक  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि.१३ जानेवारी रोजी डॉ.क्षितिज घुले पाटील यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. घुले पाटील  क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक अशोकराव मिसाळ,ज्ञानेश्वर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे,प्रा.दत्ता वाकचौरे, प्रा.बी.टी. देशमुख, प्रा.संतोष सोनवणे, कारभरी गरड,प्रा.तानपुरे,बाळासाहेब फसले,
काविळ तज्ञ सुनिल वाबळे, माजी उपसरपंच दादा गजरे, अंबादास गोंडे, डॉ. लहानू मिसाळ,भावराव मिसाळ, कादर सय्यद, कालवा निरीक्षक श्रीकांत करंजे, भाऊसाहेब जगताप,ज्ञानेश्वर फुलारी, अवधूत लोहकरे,देवा धनवडे, स्पर्धेचे आयोजक क्रिडा प्रबोधिनीचे अध्यक्ष किशोर मिसाळ, प्रशिक्षक रवींद्र डौले, नोहिद पटेल,आदित्य पुंड, मेहताप सय्यद, शरद भालेराव,सौरव वायकर,अर्जुन वाघडकर,अंबादास आरगडे आदि यावेळी उपस्थित होते.

*डॉ.घुले* पुढे म्हणाले की, भेंडा गावामध्ये आयपीएल  धर्तीवर खेळवली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा
गेल्या १० वर्षापासून सूरु आहे.भविष्यात या स्पर्धेला प्रीमियर लीगचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करु. माजी आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब
यांच्या नावाने दर वर्षी ही स्पर्धा होते. व्यायाम आणि आरोग्य याला आमदार साहेबांनी महत्व दिले आहे,त्यांच्याच विचारवर वाटचाल करीत ही क्रीडा प्रबोधिनी युवकांना व्यसनापासून दूर व त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी
काम करत आहे.
या स्पर्धेत आठ संघमालक संघांनी सहभाग नोंदविलेला आहे. भेंडा बुल्स व जयहिंद चांदा या संघात झालेल्या पहिल्या सामन्यात भेंडा बुल्स हा संघ विजेता ठरला.

———————
*स्पर्धेची पारितोषिके*

या स्पर्धेतील विजयी संघांना  प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये (श्री.अशोकराव मिसाळ), व्दितीय पारितोषिक  ३१ हजार रुपये (श्री.अनिल पंडीत शेवाळे,डॉ. शिवाजी गोरे व प्राचार्य डॉ. शिरिष लांडगे),तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये (श्री.सुनिल वाबळे,काविळ तज्ञ),
चतुर्थ पारितोषिक ११ हजार रुपये (श्री.किशोर जोजार),शिस्त बद्ध संघाला ५ हजार १ रूपये व चषक (श्री.अब्दुलभैया शेख) अशी  पारितोषिक देण्यात येणार आहे.
तर अंतिम विजेत्या संघ मालकाला श्री.किशोर मिसाळ यांच्या कडून इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येणार आहे.
दि.१८ जानेवारी रोजी स्पर्धेची सांगता व पारितोषिक वितरण होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!