नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट व नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ छगनराव काळे यांना महाराजा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. फलटण पुरस्कृत यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार जाहिर झाला असून गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी फलटण येथे होणाऱ्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या सहकार्याने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव वर्षानिमित्त समस्त वारकरी संप्रदायास समर्पित ३० वे विभागीय स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील,ह.भ.प. सुरेश महाराज सुळ,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडशाळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी,कार्यवाह सुनिताराजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे उपस्थितित कडूभाऊ काळे यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


