Wednesday, February 11, 2026

नागेबाबा परिवराकडून महिला सफाई कामगारांचा सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रातिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री संत नागेबाबा पतसंस्था व नागेबाबा परिवाराचे वतीने मकर संक्रांति निमित्त भेंडा गावामध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

नागेबाबा परिवाराचे वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून “उत्सव महिलांचा सन्मान स्त्री शक्तीचा” उपक्रमाअंतर्गत भेंडा गावाचे आरोग्य दूत बनून स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगार हिराबाई शेंडगे, छाया भालेराव, विमल जगताप, कमल मंडलिक, सुलाबाई खंडागळे, संगीता शिरसाठ या महिलांचा नागेबाबा परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
भेंडा गावच्या माजी सरपंच सुमनताई काळे, मंगलबा काळे, लताबाई काळे, छायाबाई काळे, पूजा लोहकरे, सोनाली लोहकरे, नागेबाबा पतसंस्थेच्या कल्याणी बोरुडे, आरती जैन,राणी राजगुरू,सानिया शेख व श्रीमती कोळगे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रा.सविता नवले यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या काळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!