Wednesday, March 4, 2026

अविनाश ठाणगे यांना मधुमेहावरील संशोधनास अमरावती विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान.

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

आदर्शगाव हिवरे बाजार येथील अविनाश रावसाहेब ठाणगे यांना अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान केली.

जीवनशैलीतील बदलाने मधुमेह हा एक जीवघेणा आजार झाला असून त्यावर नियंत्रण मिळविणे हे अत्यावशक आहे.हीच बाब ओळखून डॉ.ठाणगे यांनी संशोधनाचा विषय निवडला होता. डॉ ठाणगे हे एम फार्मसी केल्यानंतर डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील फार्मसी कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांना या संशोधनासाठी यवतमाळ ,पुसद येथील सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज येथील डॉ. व्ही.एन.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ.अविनाश ठाणगे यांच्या मधुमेहावरील संशोधन हे चिंच या वनस्पती मधील साखरेतील ग्लुकोज पातळी कमी करण्यासाठी असलेले गुणधर्म त्यांनी शोधून काढले. हे त्यांचे संशोधन समाजोपयोगी ठरेल अशी भावना व्यक्त होत आहे. मधुमेह हा अतिशय घातक आजार आहे. परंतु, जीवन शैलीतील बदल करून तो पूर्ण बरा करता येऊ शकतो. मधुमेह लवकर कसा बरा होईल, यासाठी औषध शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या संशोधनाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मूल्यमापन केले गेले. डॉ.ठाणगे यांच्या या यशाबद्दल आदर्शगाव कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जलसंपदा मंत्री महाराष्ट माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, सेक्रेटरी जनरल डॉ.पी. एम.गायकवाड, डायरेक्टर मेडिकल, डॉ.अभिजित दिवटे,डायरेक्टर टेक्निकल सुनील कोल्हापुरे, प्राच्यार्य डॉ.पी.वाय पवार, तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार, व नातेवाईकांनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!