नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील क्रिडा प्रबोधिनीने जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाचे क्रीडांगणावर दि. १३ ते दि.१८ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या माजी आमदार नरेंद्र घुले पाटील चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. दि. १८ रोजी झालेल्या फायनल मध्ये मॅट्रिक्स इंजीनियरिंग भेंडा संघ व हॉटेल पैलवान संघात अतिशय अटीतटीचा अंतिम सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना ठरला.
मॅट्रिक्स इंजीनियरिंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले. पैलवान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकात ६९ धावा केल्या. हे आव्हान मॅट्रिक्स इंजीनियरिंग संघाने ४.१ ष्टकात ७२ धावा करून पूर्ण केले.
भेंड्याचा मॅट्रिक्स इंजीनियरिंग संघ
माजी आ.नरेंद्र घुले पाटील चषकाचा मानकरी ठरला आहे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मॅट्रिक्स इंजीनियरिंग संघाने, द्वितीय हॉटेल पैलवान भेंडा, तृतीय पारितोषिक नेवासा ब्लास्टर तर चतुर्थ पारितोषिक भेंडा बुल्स या संघाने पटकावले. या विजेत्या संघाना रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आल्या.तसेच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच व इतर वैयक्तिक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. अंतिम विजेत्या संघाच्या मालकाला इलेक्ट्रिक स्कुटी देण्यात आली.
क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक अशोकराव मिसाळ यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, माजी उपसरपंच दादासाहेब गजरे, रामचंद्र गंगावणे,काविळ उपचार तज्ञ सुनील वाबळे, देवेंद्र काळे, बंडू भागवत, परसराम नाकाडे, सुदाम आरगडे, दिपक वायकर, हिरालाल धनवडे,सुनिल दगडे, यशवंत मिसाळ,
स्वप्निल बोधक,अनिल शेरे देवेंद्र,संतीष फुलारी, संतोष साळवे, राम गरड आदी यावेळी उपस्थित होते
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पाटील क्रिडा प्रबोधिनीचे अध्यक्ष किशोर मिसाळ, रविंद्र डौले, नोहिद पटेल, मेहताब सय्यद, आदित्य पुंड, सारंग बोरुडे, शरद भालेराव यांनी परिश्रम घेतले.रवींद्र डौले यांनी सूत्रसंचालन केले. किशोर मिसाळ यांनी आभार मानले.