Sunday, March 29, 2026

विद्यार्थ्यांनी दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावावी-सहाय्यक विक्रीकर आयुक्त पुजा शिंदे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

शालेय पाठ्यपुस्तके हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. हा पाया पक्का करा. जिद्द चिकाटी, सातत्य आणि संयम ठेउन अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. शालेय जिवनापासुनच दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावा असे प्रतिपादन सहाय्यक विक्रीकर आयुक्त पुजा शिंदे यांनी केले.

तालुक्यातील बबालाजी देडगाव येथील
तक्षशिला ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पुजा शिंदे बोलत होत्या.मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ विजय कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्य मयुरी पवार, समन्वयक कल्पना पवार यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.विजय कदम म्हणाले,भारतामध्ये उज्वल ज्ञान परंपरा अस्तित्वात आहे. तक्षशिला विद्यालय ह्या ज्ञानीपरंपरेमध्ये राहून शिक्षण देण्याचे काम करत आहे. पदवी पेक्षा ज्ञान महत्त्वाचे मानून शिक्षण घेतले तर आयुष्यात निश्चितपणे यश मिळेल.

याप्रसंगी इयत्ता नववी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. दहावीचे विद्यार्थी पितळे भावेश,कोळपे प्रीती तसेच इयत्ता बारावीचे विद्यार्थिनी दारकुंडे अंजली, तांबे प्रियंका, लाडके वैष्णवी व तांबे सृष्टी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालय सोडताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले विद्यार्थ्यांनी विद्यालयाला विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपले ऋण व्यक्त केले.

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनी सुप्रिया मुंगसे व ऋतुजा देवकाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अकरावीचा विद्यार्थी ओंकार काळे यांने आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!