Wednesday, February 11, 2026

गुहा – गणेगाव शिरस्ता येथील शरण्या अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत हळदी कुंकू संपन्न 

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

पत्रकार राहुल कोळसे गुहा:राहुरी तालुक्यातील गुहा – गणेगाव शिरस्ता याठिकाणी उभा राहिलेले शरण्या अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत रविवारी 25 जानेवारी हळदी कुंकू व महिलांसाठी विविध उपक्रम राबवून कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रत्येक महिलेला वाण म्हणून एक फुलझाड देण्यात आले. महिलांकरिता जुन्या आठवणींना प्रज्वलीत होण्याकरता बालपणीचे अनेक खेळ खेळण्यात आले यामध्ये संगीत खुर्ची,चमच्या लिंबू या खेळात परिसरातील सर्व महिला उपस्थित होत्या.

यावेळी शरण्या अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थापक हभप स्वाती ताई हापसे , मीनाक्षी कोळसे , जयश्री उर्हे, छाया कोबरणे,अलका कोळसे ,आशा कोबरणे जयश्री कोळसे, अमृता कोबरणे, सोमवती मॅडम कांचन कोळसे,सम्राज्ञी कोळसे , आरती कोळसे ,प्राजक्ता कोळसे,रुपाली कोळसे,म्हाळुबाई खेमनर यावेळी उपस्थित होत्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!