Wednesday, February 11, 2026

ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

पत्रकार राहुल कोळसे:आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुहा येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संभाजी हराळ, संस्थेचे उपाध्यक्ष, उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव शेलार, सचिव मनीषा शेलार, प्राचार्य औदुंबर कडू, उपप्राचार्य अरुण पारखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग व महिला पालक उपस्थित होते.

कार्यक्रमात इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉर्डिनेटर अमोल तोडमल, सौ. शीतल मुसमाडे, अर्जुन मुसमाडे, क्रीडाशिक्षक सौरव वरखडे, अलका कोळसे, जयश्री पागिरे, सुजाता कोळसे, गीतांजली गावडे, राजश्री गाडे, कडू मॅडम, केतकी सिनारे, कदम मॅडम, रवींद्र गागरे, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे, बाबासाहेब बनसोडे, सुनील मुसमाडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य अरुण पारखे यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!