अहिल्यानगर/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी नगर येथे आयोजित मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन मध्ये ‘रन फॉर हेल्थ’ स्पर्धेत पदक मिळविले असून त्यांनी अवघ्या ७० मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर पार केले आहे.

नगर येथे दरवर्षी मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी २०२६ मैक्सिमस नगर राइजिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत माजी आ.नरेंद्र घुले पाटील,डॉ. क्षितिज घुले पाटील,डॉ. प्रियंका पवार-घुले पाटील यांनी हाप मॅरेथॉन मध्ये दरवर्षी प्रमाणे सहभाग घेतला. श्री.नरेंद्र घुले पाटील यांनी या वर्षी देखील १० किलोमीटर अंतर ७० मिनिटांत पार करून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया, श्रीमती छायाताई फिरोदिया, श्रीमती शोभाताई फिरोदिया, डॉ.तारडे यांचे हस्ते श्री. घुले यांना पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.



