Wednesday, June 24, 2026

लोह कमतरतेसाठी ऊसाला हिराकस वापरा-डॉ.अशोकराव ढगे

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

लोह कमतरतेसाठी ऊस पिवळा पडत आहे, त्यामुळे ऊसाला हिराकस तथा फेरस सल्फेट वापरा असा सल्ला कृषि शास्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी दिला.

डॉ.ढगे पुढे म्हणाले की,नेवासा तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात असते. चालू वर्षी 2025 च्या हंगामात तीन साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे ऊस तोडणी जलद गतीने सुरू आहे.

कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, कृषी मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी जळके खुर्द येथील तुकाराम सोलट यांच्या शेतामध्ये ऊस खोडवा पिकाची पहाणी केली.

त्यावेळी पांढरी माती असल्यामुळे गावठाणाच्या परिसरात अनेक ठिकाणी लोह सुक्ष्म अन्नद्रव्याची उसावर कमतरतेची लक्षणे आढळली. उसाची पाने संपूर्ण पिवळी झाल्याचे आढळले . याकरिता लोह सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत हिराकस तथा फेरस सल्फेट एकरी दहा किलो जमिनीतून मिसळून दिल्यास उसाची पाने हिरवीगार होतील व वजनात येणारी घट टाळता येईल असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!