नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेटच्या नागेबाबा सुरक्षा कवच योजनेतून अपघातग्रस्त खातेदाराला दवाखाना उपचार खर्चाची रक्कम १९ हजार ७८३ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
नागेबाबा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून सुरु करण्यात आलेल्या नागेबाबा ‘सभासद सुरक्षा कवच योजनेत सहभाग घेतलेले संस्थेच्या खातेदार सभासद
शोभा तुकाराम काशीद यांना मागील काही दिवसांपूर्वी विषारी खेकडा चावल्याने त्यांना दवाखाना उपचारासाठी त्यांचा १९ हजार ७८३ रुपये खर्च झाला होता. सदर दवाखाना खर्चाची रक्कमेचा धनादेश श्रीमती काशीद यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
श्रीसंत नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड,किशोर मिसाळ, राजेंद्र चिंधे, अजित रसाळ,गणेश महाराज चौधरी,डॉ.लहानू मिसाळ, कृष्णा गव्हाणे, बाबासाहेब नजन, गोकुळ काळे,नागेबाबा पतसंस्थेचे शाखाधिकारी संतोष सापते, लक्ष्मण थोरात, सागर इटकर आदी यावेळी उपस्थित होते.


