Wednesday, February 11, 2026

ग्रामीण स्पर्धांमधूनच चमकणारा तारा पुढे येतो-आ.विठ्ठलराव लंघे

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ओम चैतन्य कानिफनाथ तरुण मंडळाने आयोजित केलेल्या खुल्या थ्रो-बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे संघ विजेता ठरला आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा विविध स्पर्धा ग्रामीण भागामध्ये आयोजित करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील अशा स्पर्धांमधूनच कधी कधी चमकणारा तारा पुढे येत असतो असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे कानिफनाथ तरुण मंडळ आयोजित खुल्या थ्रो-बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.३ रोजी सांयकाळी ६ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे हस्ते बक्षीस वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, माजी सरपंच अशोकराव मिसाळ व युवा नेते सिद्धांत नवले, किशोर मिसाळ, माजी उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, भाऊसाहेब फुलारी, महेश नवले, दादासाहेब गजरे, रामचंद्र गंगावणे, पिंटूशेठ वाघडकर, शनि मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

आ.लंघे पुढे म्हणाले की, शालेय जीवनामध्ये मला खेळाची विशेष आवड होती. क्रिकेट-फुटबॉल
खेळलो, बास्केटबॉल मध्ये नॅशनल खेळलो.मी खेळात ऑलराऊंडर होतो.प्रत्येकाचे आपापल्या खेळावरती प्रेम असतं. अनंत अडचणीला तोंड देऊन ग्रामीण भागातील मुलं आपला व्यवसाय, शिक्षण यातून वेळातला वेळ काढून खेळासाठी वेळ देतात.त्यामुळेच ग्रामीण खेळांमधून आपले अनेक तरुण पुढे गेलेले आहेत.खेळामध्ये प्राविण्य मिळविले तर आपल्या आयुष्याच्या उपजीविकाचे साधन ही खेळातून मिळू शकतं.खेळाडूंनी यश अपयशाला न जुमानता
‘शो मस्ट गो ऑन’ प्रमाणे खेळात सातत्य ठेवले पाहिजे.
मी ही राजकिय जीवनात निराश न होता शो मस्ट गो ऑन चालू ठेवत काम करत राहिलो, म्हणून आज हे यश गाठू शकलो.

शुक्रवार दि. ३० रोजी माजी सरपंच अशोकराव मिसाळ व युवा नेते सिद्धांत नवले यांचे हस्ते थ्रो-बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. एकूण ३२ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. कानिफनाथ तरुण मंडळ व
व पुणे या संघात अंतिम सामना झाला.कानिफनाथ संघाने ५ षटकात ७८ धावा करून पुणे संघापुढे ७९ धावांचे आव्हान ठेवले ते पुणे संघाने ४ षटक ४ चेंडूत पूर्ण केले.

संदिप ढवळे, दिवाकर वाघडकर, राहुल गजरे,अर्जुन मोरे,शिवाजी गजरे,मनोज वायकर, राहुल वाघडकर, सुनिल वाघडकर, राजु वायकर, विलास दवळे, निलेश वाघडकर, विजय वाघडकर, विशाल गजरे, करण वापडकर, राजु मोरे विकास बबळे, विशाल मोरे, दिपक बावकर, सागर साळवे, सोमनाथ वायकर, रविंद्र वाघडकर, शिवराज वाघडकर, अमोल गजरे, इंद्रकुमार बापडकर, अंकुश डवळे, योगेश काळे, साई ढवळे साई वाघडकर, करण मोरे, संतोष मोरे, राहुल उ. वाघडकर, अनिल वाघडकर, चंद्रकांत वाघडकर, अंकुश वाघडकर, नंदू सुपेकर, सचिन साळवे, कृष्णा गंगावणे, दादासाहेब वाघडकर, अनिल डवळे, रामेश्वर वाघडकर, आण्णा फुलारी, चेतन वाघडकर, अर्जुन सुपेकर, आकाश वाघडकर यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.

*या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघ असे…

प्रथम बक्षीस-पुणे संघ (५१ हजार रुपये व चषक), दुसरे बक्षीस- कानिफनाथ तरुण मंडळ भेंडा (३१ हजार रुपये व चषक), तृतीय बक्षीस- रॉक स्टार,नेवासा (२१ हजार व चषक),चौथे बक्षीस- ऑरेंज आर्मी संघ (११ रुपये व चषक).

बेस्ट बॅट्समन- धनंजय कांबळे,बेस्ट बॉलर- शैलेश दाणे,मॅन ऑफ दि मॅच- राहुल गजरे, मॅन ऑफ दि सिरीज- अनिकेत कोल्ह.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!