Wednesday, February 11, 2026

भेंड्यात निवृत्त नायब तहसिलदाराच्या घरावर दरोडा;८ तोळे सोने केले लंपास

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छींद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा-तरवडी रस्त्यावरील वस्तीवर रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तरोडा टाकून ३१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व ७ तोळे ८७ सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबद जयश्री दौलत बर्डे (वय ३३ वर्ष), रा.बर्डे वस्ती, भेंडा शिवार ता. नेवासा यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पुढील तपास करीत आहेत.

*चोरीस गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे…*

४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा(२० हजार रुपये),३५ ग्रम वजनाचे सोन्याचे गंठण (१ लाख ७५ हजार रुपये),५ ग्रम वजनाचे सोन्याची मंचली (२५हजार रुपये),५ ग्राम सोन्याचा पिळा (२५ हजार रुपये), ५ ग्रम वजनाची सोन्याची अंगठी(२५ हजार रुपये),१२.५ ग्रॅम सोन्याची कर्णफूले(६२ हजार ५०० रुपये),२.५० ग्रम वजनाचे सोन्याचे पेंडल(१२ हजार ५०० रुपये),
८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (४० हजार रुपये), २ ग्रम वजनाचे सोन्याचे कानातले(१० हजार रुपये),
सासरे मच्छींद्र बर्डे यांचा (१० हजार रुपये) व्हीवो कंपनीचा मोबाइल,३१ हजार २०० रुपये रोख रक्कमे सह पतीच्या पाकिटातील आधार, पँन कार्ड व ईतर कागदपत्रे
असा एकूण ४ लाख ३६ हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वान पथकला घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.
आमदार विठ्ठलराव लंघे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ही घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!