Saturday, February 14, 2026

तक्षशिला बनली जिल्यातील पहिली ‘एआय-रेडी स्कूल

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकत, तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. शाळेने ‘एआय क्लास रूम फाउंडेशन कोर्स’ यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल ‘जिओ पीसी’ कंपनीने (JioPC) शाळेला अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली ‘एआय-रेडी स्कूल’ (AI-Ready School) म्हणून घोषित केले आहे. मॕनेजर राजीव झा व डेप्युटी मॕनेजयर अविनाष यांनीजिओ कंपनीच्या वतिने तसे प्रमाणपत्र देऊन विद्यालयाचा गौरव केला.

“​कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाचे महत्त्व ओळखून, शाळेने विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सज्ज करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे” असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. डाॕ. विजय कदम यांनी या वेळी सांगितले. या अभिनव उपक्रमामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​या यशामागे मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम आणि संचालिका शुभांगी कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य मयूरी पवार, उपप्राचार्य संदीप खाटीक , समन्वय कल्पना पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
​या कोर्सच्या यशस्वी आयोजनासाठी आयटी शिक्षक अलफिया शेख व सुनील मुंगसे, तसेच समन्वयक कल्पना पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
​”आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आमचे ध्येय आहे. ‘एआय-रेडी स्कूल’चा दर्जा मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशी भावना यावेळी प्राचार्य विठ्ठल कदम यांनी व्यक्त केली. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, पालकांनी शाळेच्या या आधुनिक दृष्टिकोनाचे स्वागत केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!