Saturday, February 14, 2026

राज्य शासन ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी १५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नवी मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

*पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी*
यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:
* उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
* उत्कृष्ट लेखन पुरस्कार
* उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार
* उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार
* सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार
* स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

*अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी*
*कालावधी:– हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील.

*अंतिम तारीख:– प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.

* अर्ज कुठे करावा?

माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
• www.maharashtra.gov.in
• dgipr.maharashtra.gov.in
• https://mahasamvad.in (ब्लॉग)
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) श्री.गोविंद अहंकारी यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!