Monday, August 10, 2026

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नेवासात श्री स्वच्छता वारी माऊलींच्या दारी उपक्रम

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वच्छता वारी माऊलींच्या दारी उपक्रम या उपक्रमाद्वारे संत तुकाराम महाराज मंदिर ते  ज्ञानेश्वर मंदिर परिसरात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान  राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निमिर्ती केलेल्या पैस खांब मंदिरात कामिका एकादशी निमित्त झालेल्या यात्रेनंतर फुला,फळांची दुकाने,खाऊंची दुकाने,फराळ वाटप केल्यानंतर येथील परिसरात उरलेल्या पत्रावळ्या, द्रोण यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले होते हे निर्माल साफ करणे मोठे जिकिरीचे काम होते.

     एकादशी नंतर मंदिर परिसर स्वच्छ रहावा या हेतूने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते.

    सोम दि 10 ऑगस्ट रोजी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यामध्ये मंदिर परिसर व रस्त्यावर सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ज्ञानेश्वर महाविद्यालय विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. विद्यार्थी करत असलेल्या स्वच्छता मोहिमेत संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे महंत वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के स्वतः झाडू घेऊन अभियानात सहभागी झाले होते त्यांनीही स्वच्छता केली.

      या प्रसंगी बोलतांना वेदांतचार्य ह भ प देविदास महाराज म्हस्के म्हणाले की आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आवर्जून कामिका एकादशीला ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात व आपली वारी पूर्ण करतात अगदी त्याच प्रमाणे आषाढी वारीनंतर दुसऱ्या दिवशीही यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने पंढरपूर ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला  व कामिका एकादशी निमित्त दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात स्वच्छता करत प्रतिष्ठान व सोनई तसेच श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने स्वच्छतेची वारी पूर्ण केली.

 गावागावातील मंदिर व परिसरात हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवला जावा तसेच साधू – संताना अभिप्रेत असलेले काम प्रतिष्ठान व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडुन राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान उपक्रमाचे म्हस्के महाराजांनी कौतुक केले.

      यावेळी झालेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, नगरसेवक जितेंद्र कु-हे,दिनेश व्यवहारे,जालिंदर गवळी,स्वप्नील मापारी आशिष कावरे, रामकीसन कांगुणे,पत्रकार सुधीर चव्हाण,रणजित जाधव,उदय पालवे, डॉ संपत खोसे,योगेश रासने,डॉ विनायक देशमुख आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!