Monday, August 10, 2026

माळीचिंचोरा येथील सद्गुरु बन्सी महाराज तांबे चरित्र कथेला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

कामिका एकादशी, संत नामदेव महाराज व संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याचा अपुर्व संगम म्हणून माळीचिंचोरा ता.नेवासा येथे आयोजित केलेल्या सद्गुरु बन्सी महाराज तांबे यांच्या संगीत चरित्र कथेला भाविक भक्त व श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आळंदी येथील सोमनाथ महाराज पाटील यांच्या सुश्राव्य वाणीतून झालेल्या पहिल्या चार दिवसात जिल्ह्यातून विविध किर्तनकार महाराज व सामाजिक व धार्मिक संस्थेच्या सदस्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

गावातील संत सावता महाराज मंदीरात मागील वर्षी आयोजित किर्तन कार्यक्रमात सोमनाथ महाराज यांनी कथेचा संकल्प केला आणि ग्रामस्थांनी तो प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. पहिल्या दिवशी ग्रंथपूजन झाल्यानंतर प्रस्तावना झाली. बाबांचे बालपण, आळंदी येथील जोग महाराज वारकरी संस्थेत घेतलेले शिक्षण, नेवासा तालुक्यातील आध्यात्मिक कार्य आणि पैसखांब मंदीर उभारणी विषयी कथेत सविस्तर निरुपण करण्यात आले.

चौथे पुष्प गुंफताना संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त ज्ञानदेव महाराज शिंदे यांनी भेट देऊन कथेला गायन व हार्मोनियम साथ दिली. भागवत महाराज वेताळ, लक्ष्मण महाराज कर्डिले, कृष्णा महाराज, वडाळा येथील मोटे गुरुजी, आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे, शनिशिंगणापुर येथील डाॅ. राजेंद्र शेटे, रावसाहेब जावळे, अंबादास शेटे आदी उपस्थित होते. कथेला संगीत साथ विलास महाराज खाटीक, शाम महाराज बारवेकर व लतीफ महाराज शेख यांनी दिली. सात दिवसीय कथा सोहळ्यात दानशूर भक्तांनी रोजच्या महाप्रसाद पंगती घेतल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!