Thursday, June 25, 2026

रेल्वे उपोषण सोडण्याचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे आवाहन;उपोषणकर्ते उपोषणावर ठाम

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरूच आहे.९मार्च रोजी सुरू होणाऱ्या
संसदीय अधिवेशनात हा प्रश्न प्रकर्षाने मांडू अशी ग्वाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

नेवासा शेवगाव-गेवराई मार्गे  बेलापूर(श्रीरामपूर) ते परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने  रितेश विजयकुमार भंडारी,रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी  सोमवार पासून दि.९ पासून कुकाणा  येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या ७ व्या दिवशी खासदार भाऊसाहेब वाकचौरे
यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली,त्यावेळी ते बोलत होते.
माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,
भाऊसाहेब फुलारी, अरुण गरड, अण्णासाहेब गव्हाणे, प्रकाश देशमुख, सोमनाथ कचरे, बाबासाहेब गोल्हार, बंडू पाटील, सातपुते गुरुजी,अमोल।खाटीक आदी यावेळी उपस्थित होते.

खा.वाकचौरे पुढे म्हणाले की,२००९ ते २०१४ या कालावधीत खासदार असतांही मी बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न लावून धरला होता. सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दोन वेळा सर्व्हे करण्यात आला.मात्र दोन्ही वेळा आर्थिक दृष्टया न परवडणारा आहे असा अहवाल गेल्याने या रेल्वे मार्गाला स्थगिती देण्यात आली आहे.कुकाण्यात सुरू असलेल्या उपोषणाची रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांना मी कल्पना दिली आहे. सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे,येणाऱ्या ९ मार्च अधिवेशनात ही आपण हा प्रश मांडू असे खा.वाकचौरे यांनी सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली,मात्र उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिले.
खा.वाकचौरे यांनी उपोषण स्थळावरूनच रेल्वे बोर्डाचे अधिकारयांशी संपर्क करून उपोषणाला गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!