Thursday, June 25, 2026

महिलांचे सशक्तीकरण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे सामर्थ्य-सौ.रत्नमाला लंघे

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महिलांचे सशक्तीकरण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे सामर्थ्य आहे असा ठाम विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सौभाग्यवती सौ.रत्नमाला लंघे यांनी व्यक्त केला.

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शासकीय योजनांचा थेट लाभ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचविण्याच्या ठाम निर्धारातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात सौ.रत्नमाला लंघे यांनी
महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पंचायत समितीचे श्री. राठोड, श्री. कासार, श्री. सोनवणे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तहसील विभागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना याबाबत श्री. चिंतामणी व श्री. निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कामगार विभागाचे अमोल दिघे यांनी कामगारांसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. किशोर गारूळे यांनी ग्रामस्थांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
गणेश चौघुले व सौ.सुषमा साठे यांनी
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. सर्व

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!