Wednesday, April 22, 2026

नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावा-आ.लंघे यांचे प्रशासनाला निर्देश

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश आ.विठ्ठलराव लंघे यांनी प्रशासनाला दिले.

नेवासा पंचायत समिती कार्यालय, नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी बैठक
सोमवार दि.२ मार्च रोजी आ.लंघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महसूल मंडळस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या शिबिरांचे प्रभावी नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश आ.लंघे यांनी दिले.

तहसीलदार संजय बिरदार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख, नगरसेवक, सरपंच/प्रशासक व लोकप्रतिनिधी या बैठकीस
उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व जलद गतीने उपलब्ध करून देणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!