नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील अंतरवाली गावची कन्या यास्मिन शेख हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलिस उपनिरीक्षक झाली आहे. यास्मीन एमपीएससी परीक्षेत आर्थिक दुर्बल घटकामध्ये राज्यात पहिली आली.
जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात काहीही अशक्य नसते, हे नेवासा तालुक्यातील अंतरवाली ग्रामीण छोट्याशा गावातून आलेल्या यास्मिन शेख हिने सिद्ध करून दाखवले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आर्थिक दुर्बल घटक यामध्ये राज्यात पहिली येत खाकी वर्दीचे स्वप्न साकार करत पोली उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तीच्या यशाबद्दल अंतरवाली ग्रामस्थांनी मिरवणूक काढून तिचा सत्कार करत सन्मान केला.
यास्मीनचे वडील हमालीचे काम व शेती करतात. आई डोक्यावर गाठोड घालून गावोगावी फिरत बांगड्याचा व्यवसाय करते.अशा या आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेत यास्मिन शेख हिने गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत, कुकाणा माध्यमिक विद्यालय पाचवी ते दहावी, अकरावी बारावी सतरा नंबर भरून बाहेरून परीक्षा दिली कृषी डिप्लोमा भेंडा व काम करून मुक्त विद्यापीठातून पदवी घेत अधिकारी होण्याचे स्वप्न अंगी बाळगून घरची परिस्थिती आर्थिक दुर्बलतेचे असतानाही अनेक अडचणींवर मात करत शिक्षण सुरू ठेवत खडतर प्रवासातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आपला प्रयत्न सुरू ठेवला एक दोन परीक्षांच्या अपयशानंतर दुसऱ्याच प्रयत्नात तिने यंदाच्या निकालात आर्थिक दुर्बल घटकातून राज्यात प्रथम येत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली वडील हमाली व शेती आईचा गावोगावी डोक्यावर बांगड्यांचा गाठोडे घेऊन भटकंतीचा व्यवसाय अशा अशा कुटुंबातून यश संपादन करून आजच्या तरुण पिढीला दीपस्तंभ ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल आंतरवाली ग्रामस्थांनी तिची भव्य मिरवणूक काढून गावच्या वतीने मोठा सन्मान केला. कुकाणा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातही आज शेख यांचा सत्कार करण्यात आला.


