Thursday, April 30, 2026

गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांची श्रीक्षेत्र नागेबाबा संस्थानला भेट

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख।वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व गाथामूर्ती ह.भ.प.रामभाऊ महाराज राऊत यांनी भेंडा गावचे ग्रामदैवत नागेबाबा संस्थानला भेट देवून भाविकांशी संवाद साधला.

शुक्रवार दि.२३ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता श्रीसंत नागेबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर नागेबाबा भक्त निवास प्रांगणात दि. १७ ते २३ मे २०२६ या कालावधीत अधिकमासा निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या “पसायदान चिंतन” कार्यक्रम स्थळ पहाणी केली. पसायदान चिंतन कार्यक्रमा निमित्त दररोज अखंड नामजप, ज्ञानेश्वरी ग्रंथ परायण,प्रवचन, संध्याकाली ७ ते ९ पसायदान चिंतन व त्यानंतर महाप्रसादाची पंगत असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.

यावेळी भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, देवगाव, रांजणगाव, भानसहिवरा, देडगाव, कुकाणा, जेऊर हैबती, तरवडी, गेवराई, चिंचोली, गोंडेगाव, पिचडगाव, बाभुळखेडा, मक्तापूर, सौंदाळा, नागापूर, खुणेगाव, रांजणगाव, म्हसले, वाकडी, शिरसगाव, गिडेगाव, सलाबतपुर, शहापूर, फत्तेपुर, रस्तापूर, कौठा, चांदा, पिंपरीशहाली, नांदूरशिकारी, सुकळी, मंगळापुर, सुदामपूर या गावातील भाविक आणि नेवासा तालुक्यातील सप्ताह कालातील सेवेकरी,नागेबाबा देवस्थानचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!