नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील छोटे रोजेदार अनस ईस्माइल शेख (वय ६ वर्षे) याचा यावर्षीचा रोजा असून त्याने पवित्र रमजान महिन्यात पहिला रोजा उपवास केला.
इस्लाम धर्मात नमाज,रोजा,जकात,हज या चार गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे.नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अनस शेख याने पवित्र रमजान महिन्यात पहिला रोजा उपवास केला. या बद्दल जामे मस्जीद व मर्केज मस्जिद मध्ये रोजाचे महत्त्व विषद करून मौलाना शमशाद पठाण, इम्रान मौलाना यांसह ग्रामस्थांनी छोट्या बालकाचे कौतुक केले.


