Wednesday, May 13, 2026

कॉ.बाबा आरगडे एकता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह काॅ. बाबा आरगडे यांना एकता फाउंडेशन आणि मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार यांचे वतीने एकता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पाडळी ता. शिरूर कासार येथे दि.२४ मार्च रोजी एकता फाउंडेशन आणि मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार यांचे वतीने आयोजित आठवे ‘एकता मराठी साहित्य संमेलन’ संपन्न झाले. या संमेलनात नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील जात मुक्त गाव चळवळीचे प्रणेते तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह काॅ.बाबा आरगडे यांना पद्मश्री डॉ, तात्याराव लहाने यांचे हस्ते एकता जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
माजी आमदार साहित्यीक अड उषाताई दराडे, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत कराड, सचिव गोकुळ पवार,अंनिसचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,अंनिसचे नेवासा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब वाबळे, सचिन चौधरी, संजय वाल्हेकर, मल्हारी खेडकर, कवीवर्य बाळासाहेब कोठूळे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!