Wednesday, May 13, 2026

धाडगे वस्ती जिल्हा परिषद शाळेत कुसुमाग्रज बाल वाचनालय सूरु

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील नाजिक चिंचोलीतील धाडगे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने कुसुमाग्रज बाल वाचनालय सूरु करण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील धाडगे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निपुण माता-पालक मेळावा संपन्न झाला. पालकांचा शाळेशी अधिक संवाद वाढावा व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्यांचा सक्रिय सहभाग राहावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील माता-पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती तसेच वाचन संस्कृतीचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढावी यासाठी सुरू करण्यात आलेले कुसुमाग्रज बाल वाचनालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान माता-पालकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, उखाणे स्पर्धा अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

मुख्याध्यापिका श्रीमती सुमती अकोलकर यांनी उपस्थित माता-पालकांना विद्यार्थ्यांचा घरी कशाप्रकारे अभ्यास घ्यावा, त्यांच्याकडे लक्ष कसे द्यावे व शिक्षणात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती सगुणा बावलगे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!