Saturday, May 30, 2026

ह.भ.प.भास्करगिरीजी महाराजांना मातृशोक

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे आज रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६.१४ वाजता अल्पशा आजाराने देहावसान झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले ह.भ.प. भास्करगिरी महाराज व मधुकर ज्ञानदेव पेसोडे तसेच कन्या कमलबाई पांडुरंग रायपुरे असा परिवार आहे.
सरुबाई पेसोडे यांच्या देहावसानाने देवगड परिसरातील नागरिक तसेच भक्तपरिवारावर शोककळा पसरली आहे.त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात आज सायंकाळी ४.३० वाजता होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!