Wednesday, May 13, 2026

पद्माटेक इंडस्ट्रीजला ‘महाराष्ट्र उद्योग रत्न’ पुरस्कार

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावचे भूमिपुत्र इंजिनियर किशोर सोपानराव नवले यांच्या पुणे येथील पद्माटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रिसील मार्केट रिसर्च अँड फिल्म कंपनी (Reseal) या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१ मे रोजी नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात मराठी )अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पद्माटेकच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा नवले व विपणन संचालक किशोर नवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.उद्योगांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेषतः रोजगार निर्मिती,उद्योगांची सेवा आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात करून भारतासाठी परकीय चलन मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.

पद्माटेक इंडस्ट्रीज ही  ही कंपनी १९
वर्षांपासून मशिनरी क्षेत्रामध्ये कार्यरत
आहे.फार्मासिटिकल तसेच केमिकल कंपन्यांसाठी गुणवत्तापूर्ण मशनरी निर्मितीसाठी २०२२ मध्ये केंद्र शासनाचा ‘बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट’ हा सर्वोच्च पुरस्कार पद्माटेक कंपनीला प्राप्त झालेला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या किशोर नवले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस नोकरी व नंतर लगेच व्यवसायात पदार्पण केले. भोसरी येथे त्यांनी पहिला प्रकल्प उभारला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील पांढरीपूल येथील एमआयडीसीमध्ये दुसरा प्रकल्प उभारला. अन्न प्रक्रिया उद्योग,केमिकल कंपनी तसेच फार्मासिटिकल क्षेत्रात कार्यरत देशभरातील विविध राज्यातील अनेक नामवंत उद्योगांसाठी त्यांनी मशनरी निर्मितीचे कार्य केले आहे. मशनरी निर्मिती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानात पद्माटेक कंपनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

या पुरस्कारा बाबद बोलतांना विपणन संचालक श्री.किशोर नवले म्हणाले की,
हा सन्मान आमच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा नवले, कार्यसंचालन संचालक सोमनाथ नवले यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि उत्कृष्टतेचे स्वप्न अधोरेखित करतो. तसेच पद्माटेक इंडस्ट्रीजच्या आमच्या मुख्य टीमचा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा मिळालेला खंबीर पाठिंबाही यातून प्रतिबिंबित होतो.
त्यांच्या सातत्यपूर्ण कठोर परिश्रमामुळे, निष्ठेमुळे आणि उत्कृष्टतेप्रती असलेल्या कटिबद्धतेमुळेच हे यश साध्य करणे शक्य झाले आहे. हा पुरस्कार पद्माटेक इंडस्ट्रीजच्या यशात दररोज योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि कामगाराचा आहे.या सर्वांच्या योगदानाची दखल खुद्द उद्योगक्षेत्राने घेतली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!