Sunday, June 28, 2026

पसायदान प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शिवम फायटर संघ विजेता

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील नजिकच चिंचोली येथे पसायदन समुहाचे प्रमुख शिवाजीराव पाठक यांनी आयोजित केलेल्या पसायदान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शिवम फायटर संघ विजेता तर खडेश्वरी इलेव्हन,दिघी संघ उपविजेता ठरला आहे.

प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळातो. ग्रामीण भागात ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू दडलेले आहेत, त्यांना पाठबळ देण्याचे काम करू अशी ग्वाही मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील युवा उद्योजक शिवाजीराव पाठक यांच्या भिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पसायदन उद्योग समुहाने आयोजित केलेल्या पसायदान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार दि.७ मे रोजी सांयकाळी श्री.उदयन गडाख यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंदगिरी महाराज, सेना नेते बाळासाहेब पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उद्योजक शिवाजीराव पाठक, नामदेवराव निकम,वैभव नवले,किशोर भगणे,नयन फुलारी, योगेश आहेर,मुळाचे संचालक बाबासाहेब भणगे, निलेश फुंदे, अशोकचे संचालक माऊली काळे,अझर शेख,प्रवीण गोडसे,महेश भणगे,मयूर पाठक,रवींद्र औताडे, विठ्ठल काकडे,राजेंद्र मोरे,नाना चौघुले, बद्रीनाथ चिंधे,रवी औताडे,नरेंद्र पाठक, बाबासाहेब आदमाने,सोपान कर्डीले, पुरुषोत्तम चिंधे,ओंकार पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

दि.२ मे रोजी माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन झाले होते. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले होते. दि.७ रोजी शिवम फायटर व खडेश्वरी इलेव्हन,दिघी संघात अटीतटीचा अंतिम सामना झाला,त्यात शिवम फायटर संघ अंतिम विजेता (५१ हजार रुपये व चषक) , खडेश्वरी इलेव्हन संघ उपविजेता (४१ हजार रुपये व चषक), विघ्नहर्ता इलेव्हन बेळपांढरी संघ तृयीय (३१ हजार रुपये व चषक) तर पाटील वारीअर्स बाभुळखेडा संघ (२१ हजार रुपये व चषक) चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरला आहे. अंतिम विजेत्या संघ मालकाला इलेक्ट्रिकल स्कुटी बक्षीस म्हणून देण्यात आली.

महंत गणेशानंदगिरी महाराज, सुरेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.रेवनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.शिवाजीराव पाठक यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!