अहिल्यानगर, दि.११
जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली आहे.



