नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील।चंद्रभागा महिला विकास प्रतिष्ठान संचलित अल्फा इंग्लिश मिडियम स्कुला ११ वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याला शिक्षण विभागाची मान्यता मिळाली आहे.

बुलढाणा जिल्हा पतिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शना खाली भेंडा खुर्द येथे चंद्रभागा महिला विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत गेल्या १० वर्षापासून अल्फा इंग्लिश मिडीयम स्कूल सुरू आहे.शासन मान्यता प्राप्त कॉलेज, दर्जेदार शिक्षण व्यवस्था,प्रशस्त खेळाचे मैदान
सीसीटीवी निगराणी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुविधा, माफक दरात प्रवेश, NEET/JEE/CET मार्गदर्शन,सुसज्ज प्रयोगशाळा व कॉम्पुटर लॅब,करियर मार्गदर्शन, अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक वृंद
व संगीत वर्ग ही प्रमुख वैशिष्ठ्य असलेल्या या संस्थेला सन २०२६-२७ या वर्षापासून इयत्ता ११ वी १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रवेश क्षमता *
सायन्स करिता ६०विद्यार्थी, कॉमर्स करिता ६० विद्यार्थी व आर्टस् करिता ६० विद्यार्थी अशी प्रवेश क्षमता आहे.२०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता ११ वी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छुकांनी आपल्या ऑनलाईन प्रवेश फॉर्ममध्ये आपल्या जवळच असणाऱ्या गेल्या १० वर्षापासून सुरु असलेल्या अल्फा इंग्लिश मिडीयम स्कूल व आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज भेंडे खुर्द, ता. नेवासा या इंग्रजी माध्यम कॉलेजच्या नावाने प्राधान्यक्रम द्यावा असे आवाहन संस्था व्यवस्थापनाने केले आहे.



