Tuesday, May 19, 2026

कुकाणा परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास अटक

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत कुकाणा दूर क्षेत्र हद्दीत इसमावर पोलिसांनी कारवाई करून अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास अटक करण्यात आल्याची पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश व्दारकानाथ सावंत (वय २९ वर्षे) रा. देवसडे ता. नेवासा हा स्वतःचे कब्जात गावठी कट्टा (पिस्तुल) घेवुन कुकाणा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यास पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सपोनि अमोल पवार, पोहेकॉ शहाजी आंधळे, पोकॉ आप्पासाहेब वैद्य, पोकॉ हरिभाऊ धायतडक, पोकॉ अमोल डमाळे यांनी पथकासह जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे ५० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटी कट्टा (पिस्तुल) मिळुन आल्याने सदर घटनेबाबत पोकॉ हरिभाऊ धायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०३/२०२६ शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलबरमे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ शहाजी आंधळे, हेकॉ हरी धायतडक ,पोकॉ अमोल डमाळे ,पोकॉ आप्पासाहेब वैद्य यांनी केली आहे.पुढील तपास पोहेका शहाजी आंधळे हे करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!