Friday, May 15, 2026

बालाजी देडगाव महादेव मंदिर देवस्थानाला ‘क’वर्ग दर्जा

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थानास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.१५ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ‘क वर्ग’ दर्जा मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली .

अधिक माहिती देताना आ.लंघे म्हणाले की, बालाजी देडगाव हे राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे पुरातन बालाजी मंदिर असून, मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरत असून महाराष्ट्रासह परराज्यातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देडगाव येथील महादेव मंदिर, वराह मूर्ती व प्राचीन बारव यांना अहिल्याबाई होळकर यांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हेमाडपंथी स्थापत्य, धार्मिक परंपरा आणि महाशिवरात्रीला होणारा अखंड हरिनाम सप्ताह यामुळे या देवस्थानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. सदरची बारव ही दुष्काळामध्ये गावाच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य आधार आहे.
गावातील स्वयंभू बालाजी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि अन्नदानाचे आयोजन केले जाते. यात्रा काळात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जात असून स्थानिक व्यापारालाही मोठी चालना मिळते.
देडगाव परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला असून येथे आढळणारे प्राचीन अवशेष, वराह मूर्ती आणि जुनी बारव संशोधकांचेही आकर्षण ठरत आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांमुळे या गावाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
‘क वर्ग’ दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसराच्या विकासासाठी दरवर्षी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असून, भाविकांसाठी विविध सुविधा उभारणे, परिसर सुशोभीकरण, रस्ते, पाणी व स्वच्छता यांसारख्या विकासकामांना गती मिळणार आहे.
प्रसिद्ध हस्तरेषा भविष्यकार कै. कनकमलजी मुथ्या यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून ग्रामस्थांच्या सहकार्याने देवस्थानचा विकास करण्यात आला आहे. ‘क वर्ग’ दर्जामुळे भविष्यात देवस्थान परिसरातील विकासकामांना अधिक चालना मिळणार आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळेच महादेव मंदिर देवस्थानास ‘क वर्ग’ दर्जा मिळाल्याबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!