नेवासा/प्रतिनिधी
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य गावठी कट्टा बाळगणा-या इसमांविरुध्द पोलीसांनी कारवाई गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक केली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, सुयश नानासाहेब नवथर रा.पिंपरी शहाली ता. नेवासा याने दि. १०/०५/२०२६ रोजी सायंकाळी १८ वाजेचे सुमारास पिंपरीशहाली ता. नेवासा या गावात बैलगाडा शर्यत संपल्यानंतर त्याचे कडील गावठी कट्टयातुन स्वतः फायरिंग करुन फायरिंग मुळे त्याच्या स्वतःच्या उजव्या पायाचे घोट्याला गोळी लागुन तो जखमी झाला होता व तो गावठी कट्टयासह पिंपरी शहाली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ सुमित संजय करंजकर, पोकॉ नारायण एकनाथ डमाळे, पोकॉ अतुल अशोक शेळके, चापोकॉ कैलास कचरु म्हैसमाळे यांनी पथकासह जावुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन २० हजार रूपये किंमतीचा एक स्टिलचे देशी बनावटीचा त्याला काळ्या पटीची ग्रिप असलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असुन सदर घटनेबाबत पोकॉ नारायण एकनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११०, १२५ (ब) सह शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ सुमित संजय करंजकर, पोकॉ नारायण एकनाथ डमाळे, पोकॉ अतुल अशोक शेळके, चापोकॉ कैलास कचरु म्हैसमाळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.





