Friday, July 17, 2026

ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी निवृत्तीनाथाकडे केलेली मागणी म्हणजे पसायदान-गाथामुर्ती रामभाऊ राऊत महाराज

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

पसायदान ज्याने मागितलेले आहे, ज्यांच्याकडे मागितलेले आहे आणि जे मगितलेले आहे ते सगळेच महान आहेत. गितेचा अर्थ सामन्यांना समजावा यासाठी ७०० श्लोकांवर ९००० व यांची ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी ज्ञानेश्वराने निवृत्तीनाथाकडे जी मागणी केली ते म्हणजे पसायदान होय असे प्रतिपादन  गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवाराचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात रविवार दि.१७ मे रोजी
पहिल्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञं तोषावें।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो।

पसायदानातील या तीन ओव्यांवर  निरूपण करताना राऊत महाराज पुढे म्हणाले की,पसायदान हे स्वतंत्र प्रकारचे चिंतन आहे. ज्ञानोबारायांना माऊली म्हटले आहे,ते का म्हंटलेलं आहे त्याच उत्तर पसायदानात सापडते. ज्ञानोबांच्या ‘माऊली’ या विशेषणावर वेदशास्त्रांनी ही शिक्कामोर्तब केलेले आहे. माऊली हे आईचे पर्यायी नाव असून ते गौणी वृत्तीचे आहे. आई सदैव आपल्या मुलांच हित पाहत असते. हिताचे वास्तव आणि ज्ञान संतांना असते. हित-अहित कशात आहे याचे संशोधन संत करत असतात. गितेचा अर्थ सामन्यांना समजावा यासाठी ७०० श्लोकांवर ९००० व यांची ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरांच्या शेवटी ज्ञानेश्वराने निवृत्तीनाथाकडे जी मागणी केली ते म्हणजे पसायदान.
पसायदानाची सुरुवात ‘आता’ या शब्दाने झालेली आहे, ‘आता’ हा शब्द संस्कृत मधील ‘अथ’ या शब्दापासून आलेला आहे.  ‘अथ’  या शब्दाचा मुख्य अर्थ ‘आरंभ’ किंवा ‘सुरुवात’  असा आहे. विश्वात्मक म्हणजे ब्रह्मात्मक.

येणें वाग्यज्ञं तोषावें।  याचा अर्थ वाक् म्हणजे वाणी किंवा शब्द आणि यज्ञ म्हणजे पवित्र कार्य.शब्दांचा यज्ञ म्हणजेच ‘वाग्यज्ञ’.

जे खळांची व्यंकटी सांडो। याचा अर्थ दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे खळ, खळ म्हणजे दुर्जन, दुर्जनांचा सज्जन होवो.

सत्कर्मी रती वाढो। याचा अर्थ चांगले कर्म करण्याचे प्रेम निर्माण होवो.

ज्ञानोबारायांचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे मोठे आहे त्यांनी तर कृपा केली तर पशु देखील पशु देखील वेद बोलतात.

*कीर्तनकार म्हणजे संत नव्हे…
कीर्तनकार संत असतात हा गैरसमज आहे. कीर्तन हे संत होण्याचे साधन आहे. ज्याचा देह निरासलेला आहे,तोच संत असतो. कीर्तनकार आणि लोकांना मोठेपणा, मिरवायला लागते. कीर्तन हे हासण्याचे माध्यम नाही.  
गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!